Posts

अखंड शिवनाम सप्ताह

Image
  शिवनाम सप्ताह चे आयोजन श्री क्षेत्र संगमेश्वर (चंद्रभागोतीरी) , गणेशवाडी , ता. कर्जत , जि.अहमदनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह दिनांक १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे.   या  सप्ताहामध्ये अखंड शिवनाम जप , ज्ञानेश्वरी पारायण , भजन , कीर्तन , प्रवचन , जागर व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिरसाने नटणार आहे. सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी कुटुंबासह उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा , सर्व भाविक भक्तांना  ही नम्र विनंती.

आदर्श आपले सरकार सेवा केंद्र

Image
                       शासनाच्या विविध विभागाचे दाखले व सेवा व ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात. नागरिकांना तालुका/ जिल्हा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नये हा मुख्य उद्देश . जन्म/ मृत्यु, उत्पन्नाचा, विवाह प्रमाणपत्र, रहिवाशी, जातीचा, इ. व  विधवा/ निराधार प्रमाणपत्र, संजय गाधी, श्रावणबाळ निराधार योजना तसेच विविध योजनांचे अर्ज सादरकेले जातात.

GramPanchayat Of Ganeshwadi

Image
  गावातील नागरिकांना प्रशासकीय सेवा सुविधा देणारे मुख्य कार्यालय. शासनाच्या योजना व उपक्रम गाव पातळीवर राबवण्याचे काम येथे होते.  गावच्या विकास कामांचे नियोजन व अंमलबजावणी ग्रामसभा व ग्राम. प. च्या बैठकींचे नियोजन व नोंदी येथे ठेवल्या जातात.